करायचा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा; खासदार संभाजीराजे कडाडले

 

 

कोल्हापूर: वृत्तसंस्था । नांदेडमधील मराठा आंदोलनातील 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा. सामान्य मराठा बांधवांच्यावरच गुन्हे दाखल का? असा सवाल खासदार संभाजीराजे   यांनी केला आहे.

 

 

छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोव्हिडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?, असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.

 

काल नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले. मराठा समाजाच्या मनातील खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाजाने जमून एकी दाखवली. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आक्रमक होताना दिसले. एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. वजिराबाद पोलिस ठाण्यात हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

मराठा मूक आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. संभाजीराजे यांनी गर्दी जमवून कोरोना नियामांचं उल्लंघन केल्याने आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती.

 

Protected Content