नियोजित शौचालयाची जागा बदलण्याची राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी  ।  नवीन बसस्थानकासमोर सुप्रीम कंपनीच्या सहकार्याने बांधण्यात  येणारे आधुनिक सुलभ शौचालय पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्याकडे  राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे.  

नवीन बसस्थांनकासमोर या शौचालयाच्या बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेस अनेक संस्था , संघटनांचा विरोध आहे.  येथे जवळच चिमुकले राम मंदिर आहे. तसेच  नियोजित शौचालयाचे OUTLET (exhaust ) ज्या दिशेला आहे. त्या जागेवर शहीद सैनिक स्मारक  आहे.  यामुळे सैनिक व माजी सैनिकांनाही ही जागा अयोग्य वाटत आहे. या शौचायालयाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्यास लोकांच्या धार्मिक व ऐतिहासिक भावना दुखाऊन वाद निर्माण होण्याची भीती आहे. जनभावना लक्षात घेऊन ते नियोजित हॉटेल तिरूपती समोर , पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ हलविण्यात यावे.    पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ जिल्हा क्रीडा  संकुल आहे. थोड्याच अंतरावर बसस्थानक आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशी व खेळाडू यांची सोय होणार आहे. वेळोवेळी पोलिस , सैन्य भरतीसाठी  पोलिस मल्टीपर्पज हॉलमागील मैदानावर येणार्‍या तरुण-तरुणींसाठी सुध्दा शौचालय सोईचे ठरेल. जनभवना दुर्लक्षित करून नियोजीत शौचालयाची जागा पोलिस मल्टीपर्पज हॉलजवळ स्थलांतरित न केल्यास जन आंदोलन छेण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. डॉ. अश्विनी विनोद देशमुख, मुविकोराज  कोल्हे,  मनोज वाणी, जयश्री बऱ्हाटे, तनुजा भिरुड, लीना पाटील,  ममता पाटील,  मानसी पाटील, वर्षा पाटील, मिलिंद सोनवणे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, यशवंत पाटील, राकेश पाटील, अजय सोनवणे, कृष्णा पाटील, रईस खाटीक, दीपक सोनार आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत

Protected Content