रावेरात मध्यरात्री घरातून रोकड लांबविणारा अटकेत; पोलीसात गुन्हा

रावेर प्रतिनिधी । रात्रीच्या वेळेस घरात प्रवेश करुन डब्ब्यातून ५ हजारांची रोख लंपास केल्याची घटना शहरातील जीआयएस कॉलनीत नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास रोकडसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एक चोरटा अद्यापही फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बबलु उर्फ उखा नामदेव गायकवाड आणि सुनिल भिल रा रावेर बर्डी भाग(पुर्ण नांव माहित नाही) असे चोरी करणाऱ्या आरोपींचे नावे आहे. दरम्यान, सुनिल भील अद्याप फरार आहे.

रामकिसन मनीराम राजपुत, (वय-55,धंदा-शेती,रा. जी.आय.एस काँलनी,रावेर) यांच्या घरात (दि.२० ऑगस्ट) रोजी ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करून घरातील डब्यातून रोख 5000/-रुपये काढत असता रामकिसन यांना घरात आवाज आला त्यांनी उठून पाहिले असता दोन्ही आरोपी पळून जात असत बबलु याला पकडला त्याचे ताब्यातील चोरलेले रोख 5 हजारा रुपयांचा रोख मिळून आला तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. याप्रकरणी चोरट्याविरोधात २१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून १४ मि. रावेर पोलीस स्टेशन CCTNSगु.र.नं. 285  /2021,भा.दं.वि.कलम 380,457,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात पुढील तपास  स.फौ. ईस्माइल शेख करत आहेत. 

 

Protected Content