Home Cities जळगाव राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे अग्निशमन दलाच्या जवानांचे औक्षण (व्हिडिओ)

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे अग्निशमन दलाच्या जवानांचे औक्षण (व्हिडिओ)

0
116


जळगाव, प्रतिनिधी  । आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचविणारे अग्निशमन दलाच्या जवानांना राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे राखी बांधून त्यांच्याबद्दल  मंगल कामना व्यक्त करत त्यांचे औक्षण करण्यात आले. 

 

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानाराध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळ रस्त्यावरील अग्निशमन दलाच्या कार्यलयात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजित घरडे,प्रकाश चव्हाण,सोपान जाधव,राजू चौधरी, पन्नालाल सोनवणे,देविदास सुरवाडे,युसुफ पटेल,प्रदिप धनगर,तेजस जोशी,राजमल पाटील,गंगाधर कोळी,नितीन बारी,सोपान कोल्हे,निवांत इंगळे,आणि विक्रांत घोडेस्वार यांचे औक्षण करून त्यांना पेढे भरविण्यात आले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/2936745783210443

 


Protected Content

Play sound