. . .तर राणे ५० वर्षे तुरूंगात जातील : संजय राऊतांचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार करत खासदार संजय राऊत यांनी त्यांना इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात आता चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. कालच राणेंनी राऊतांवर शेलक्या भाषेत टिका केली होती. ते स्वत:च तुरूंगात जाण्यासाठी मार्ग तयार करत असल्याचा टोला त्यांनी मारला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, मला बोलायला लावू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली, तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील. हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्र काढून बाहेर या. मग दाखवतो, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झाले आहात का? कोण काय बोलतंय तसेच प्रत्येकाचे वक्तव्य आम्ही सरन्यायाधीशांना पाठवत आहोत. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार नाहीत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

Protected Content

%d bloggers like this: