रावेरात आगामी सणांच्या पर्सवभूमीवर पथसंचलन

 

रावेर, प्रतिनिधी । आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शहरात पोलिसांनी डीवायएसपी पिंगळे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले.

रावेर पोलीस स्टेशनतर्फे “दुर्गादेवी विसर्जन,” “विजया दशमी”, ” ईद -ऐ-मिलाद “च्या अनुषंगाने रावेर शहरात पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अंबिका व्यायाम शाळा, गांधी चौक, भोई वाडा, राजे छ.शिवाजी महाराज चौक, पाराचा गणपती, थळा भाग, नागझीरी, राजे संभाजी चौक, बंडु चौक, पंचशील नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे परत रावेर पोलीस स्टेशन आला. यावेळी एपीआय शितलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पीएसआय मनोज वाघमारे व पीएसआय आगरकर, एसआरपीएफ, रावेर पोलीस स्टेशन चे २० पोलीस कर्मचारी, आरसीएफ क्र.७ चे १+१७ पो.कर्म., एसआरपीएफ नागपूर चे २२ पो.कर्म. व रावेर युनिटचे ४१ होम गार्ड असे एकूण ५ अधिकारी व १०० कर्मचारी यांनी पथसंचलन केले आहे.

Protected Content