जिल्ह्यात आज २५६ रूग्ण कोरोनामुक्त ; १७८ रूग्ण कोरोनाबाधित

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात १७८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर जिल्ह्यातून आज २५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील जामनेर मुक्ताईनगर, जामनेर तालुका व जळगाव शहर येथे रूग्ण अधिक दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २६, जळगाव ग्रामीणी-४, भुसावळ -११, अमळनेर-८, चोपडा-५, भडगाव-१, पाचोरा-१३, धरणगाव-५, यावल-५, एरंडोल-५, जामनेर-४०, रावेर -१४, पारोळा-३, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-३०, बोदवड-०, इतर जिल्हे-१ असे एकुण १७८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ५२ हजार ६९३ कोरोना बाधित झाले आहे. त्यापैकी ५० हजार ०७२ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून हजार ३६७ रूग्ण उपचार घेत आहे. आज दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. एकुण मृतांचा आकडा १ हजार २५४ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासने दिली आहे.

Protected Content