मु.जे. महाविद्यालयात रासेयोतर्फे ‘उपक्रमशील शिक्षण व युवक’वर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज २४ ऑक्टोबर रोजी “उपक्रमशील शिक्षण व युवक” या विषयावर विशेष व्याख्यानाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटेच्या नात सून समीक्षा गोडसे (आमटे) प्रमुख वक्त्या महणून उपस्थित होत्या. त्या भामरागढ येथील लोकबिरादरी आश्रमशाळा प्रकल्प हेमलकसाच्या शिक्षण विभाग प्रमुख सुद्धा आहेत. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांना संबोधित म्हटले की“ वर्षातले सहा महिने ज्यांचा जगाशी संपर्क नाही, साधा रस्ता नाही, वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही व दळणवळणाची पुरेशी साधने नाही अशा दुर्गम आदिवासी भागात समाज सेवेचे कार्य उभे राहू शकले. दुर्गम भागातील आदिवासी मुलांना विशेषत माडिया गौंड जमातीतील मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत शिक्षण पोहचविण्याचे काम त्यांना समजेल अशा भाषेत केले जात आहे. 

प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणाचे पवित्र कार्य निरंतरपणे करण्याची गरज आजच्या युगात जास्त आहे. आदिवासी दुर्गम भागात शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही स्थानिक लोकांच्या सहकार्यामुळे यावर उपाय म्हणून आम्ही सर्व शिक्षक गावातील वस्त्यांमध्ये जाऊन तिथेच झाडाखाली बसून मुलांना शिक्षणाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समीक्षा गोडसे यांना शिक्षण व  समाजसेवे विषयी अनेक प्रश्न विचारलेत व त्या प्रश्नाची समर्पक उत्तरे त्यांनी विद्यार्थांना दिलीत. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी केले. तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नम्रता महाजन यांनी आभार मानलेत. या कार्यक्रमात रा.से.यो. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विशाल देशमुख, डॉ. योगेश महाले डॉ. नसीकेत सूर्यवंशी, प्रा.निलेश चौधरी इत्यादी प्राध्यापक आणि ४५ विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content