‘नीट’ परीक्षेत रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

जळगाव प्रतिनिधी । वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये जळगाव शहरातील रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल जैन या विध्यार्थ्याने ७२० पैकी ७०० गुण मिळवून देशात ८१ वा, महाराष्ट्रात चौथा व जिल्हातून प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. जळगाव जिल्हात नीट परीक्षेत एवढे मोठे यश संपादन करणारा साहिल जैन हा जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

शहरातील रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात शिक्षण घेऊनही आपण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट’ परीक्षा मध्ये चांगले मार्क पाडू शकतो. त्यासाठी मोठा खर्च करून पुण्याला किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही. शिकविण्यासाठी चांगले शिक्षक व मन लावून नेटाने अभ्यास केला तर नीट परीक्षेमध्ये आपण चांगले शिक्षण घेऊनही चांगले मार्क पाडू शकतो हे या साहिल जैन या विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांवरून सिद्ध झाले आहे.

या अनुषंगाने जैन यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद खराटे तसेच शिक्षक, कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन व अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Protected Content