ईद-ए-मिलादनिमित्त मदरसा हजरत बिलाल ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर परिसरात ईद-ए-मिलादनिमित्त मदरसा हजरत बिलाल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यात वृक्षारोपण, गरजूंना अन्नधान्य वाटप आणि कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ८ वाजता शहरातील शिवाजी नगर परिसरात वृक्षवाटप आणि वृक्षरोपणाने करण्यात आले. सकाळी १० वाजता गरजू गरीब अन्नधान्य व कोरोना बचावसाठी १ हजार मास्कचे वाटप केले. दुपारी ४ वाजता कोरोना काळात मोलाची भूमीका निभावनाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. तर हजरत बिलाल ट्रस्टचे विद्यार्थी आणि विद्यार्थींनींसाठी कविता स्पर्धा घेण्यात आली. 

माजी उपमहापौर करीम सलार, पंकज नेवे,  प्रा.रफिक शेख,  किशोर पाटील, फिरोज पठाण, इकबाल बाबुजी, आरीफ वकील यांच्याहस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, रज्जाक शेख, विजय बांदल, अभिमान अंबोरे, सैय्यद खालीद, आरिफ, परिसरातील हिंदु मुस्लीम बांधव व भगिनी उपस्थित होते.व तसेच हजरत बिलालचे पदाधिकारी सदस्य यांचे सहकार्य लाभले. यावेळी कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार सैय्यद अकिल पहेलवान यांनी मानले.

Protected Content