पाईपलाईन फुटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण

sima aahire

अमळनेर प्रतिनिधी । येथिल कलागुरु ड्रीम सिटीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, शहरातून जाणाऱ्या पिंपळे नाल्यावर धार-मालपूर बंधाऱ्याच्या पुनर्भरणाच्या कामासाठी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण महसूल विभागाने सुरू केले. त्यात कलागुरु ड्रीम सिटी व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनस् अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक रहिवासी प्रशासनाच्या दारी फिरत होते. फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्तीची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. तेव्हा अखेर स्थानिक राहिवस्यांनी मा.प.स. उपसभापती श्याम अहिरे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, यांचेसह सूर्यकांत निकम, सी.वाय.पाटील, रविंद्र अहिरे, अरुण नेरकर, वसंत पाटील, गुलाब वाघ यांनी  प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. मात्र, ‘नाला खोलीकरण, रुंदीकरण व अतिक्रमण’ काढण्याच्या कामास विरोध नाही. पण नाल्याचे काम होत असतांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनस् फुटल्यास ती संबधितांनी त्वरित दुरुस्त करून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी, श्रीनिवास मोरे, अविनाश पाटील, बोरसे आप्पा, राजेंद्र शिरसाठ, विक्रम शिंदे, उमेश सोनवणे, पी.आर.पाटील, स्वप्निल पाटील, खुशाल बोरसे, राज जाधव, खंडू पाटील, चुडामन पाटील, निलेश पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकारी यांनी तहसीलदार व न.प. प्रशासनास याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशीही नाल्याचे काम सुरूच होते. पाईपलाईन दुरुस्त होणार नाही, असे लक्षात येताच नागरिकांनी नगराध्याक्ष्याचे राजभवन गाठले. त्याठिकाणी, मा.आ. कृषिभूषण पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचेसह तहसीलदार ज्योती देवरे, कलागुरु ड्रीम सिटीचे बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी, धार मालपूर शेतकऱ्यांचे नेते प्रा. गणेश पवार आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत चर्चा करून आपसी समन्वयातून पाईपलाईन दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. अखेर रहिवास्यानी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी मोठ्यासंख्येने महिला उपस्थित होत्या.

Protected Content