खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण : पोलिसावर कारवाईची मागणी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी  । शहरात संचारबंदी लागू असताना याचे वृत्ताकांन करत असलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याचा निषेध करत संबधित पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोरोनाला आटोक्यात आणून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांसाठी शहरात संचारबंदी लागू केली होती. दरम्यान पत्रकार आपले कर्तव्य बजावत असताना शहरातील सिग्नल चौकात चित्रफित करत असताना एका पोलिस कर्मचारीने मोबाईल हिसकावून कोणाला विचारून चित्रफित करत आहेत. असे विचारून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. १३ व १४ मार्च रोजी शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले होते. दरम्यान पत्रकार आनंद गांगुर्डे हे शहरातील सिग्नल चौकात दि. १३ मार्च रोजी सकाळी ११:३० सुमारास चित्रफित करत होते. मात्र धर्मराज पाटील हा पोलिस कर्मचारी आनंद गांगुर्डे यांच्याजवळ येऊन चित्रफित करण्याची परवानगी कोणाकडून काढली असे विचारत लगेच आनंद गांगुर्डे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या अमानुष वागणूकीमुळे सदर पोलिस कर्मचारीवर कारवाई करून निलंबित करावे या आशयाचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे देण्यात आले. सदर पोलिस धर्मराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, जिल्हा अध्यक्ष प्रविण  सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी आनंद गांगुर्डे, गफ्फार मलिक, रोहित शिंदे, रणधीर जाधव, योगेश मोरे, खुशाल बिडे, गफार शेख, राजू चव्हाण, सोजीलाल हाड, जीवन चव्हाण व दीपक गढरी आदी उपस्थित होते.

 

Protected Content