महसुल पथकाद्वारे वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर जप्त

 

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यात महसूल प्रशासनाने तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफियांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यानुसार महसूल पथकाद्वारे आज थोरगव्हाण शिवारातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात केले आहे. 

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील थोरगव्हाण सकाळी मार्गावरील शिवारातून विनापरवाना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महसुलच्या पथकास आढळुन आले असता ते ट्रॅक्टर जप्त केले करण्यात आले आहे. ही कारवाई नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक हिरामण सावळे, शिपाई रामा कोळी यांनी केली आहे. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी व तपास मागावर असतांना थोरगव्हाण साकळी रस्त्यावर ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच १९ सियु ९८५९ या वाहनाने समाधान मंगल सोनवणे रा. थोरगव्हाण हा विनापरवाना वाळूची वाहतूक करतांना आढळून आल्याने पथकाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी पोलीस स्टेशनला जमा केले आहे.   

 

Protected Content