तब्बल ५९ दिवसानंतर ‘त्या’ दाम्पत्याचे उपोषण स्थगित !

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आर्थिक फसणूक करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी १८ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण पुकारणाऱ्या गुजर दाम्पत्याने तब्बल ५९ व्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे.

 

जामनेर तालुक्यातील मौजे नेरी बु.येथील रहिवाशी  सुनील दामु गुजर यांच्या मालकीचा सोयाबीन व मका ईश्वरलाल कोठारी, सुरेश कोठारी, अतुल कोठारी यांनी परस्पर विक्री केला होता. यामुळे संबधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी  सुनील दामू गुजर यांनी त्यांच्या पत्नीसह  जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण १८ जुलै २०२२ पासून आरंभले होते.  त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने त्यांच्या  पत्नीने १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.  या उपोषणाची ५९ व्या दिवशी पोलीस अधीक्षक यांनी दखल घेतली आहे. त्यांनी  पाठविलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सुनील गुजर यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्या मागणीनुसार १५ दिवसात चौकशी नाही झाली तर स्थगित केलेले उपोषण पुन्हा आरंभले जाईल असा  इशारा सुनील गुजर यांनी  दिला आहे.

 

Protected Content