पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील नेहरू पुतळाजवळ अस्थापना बंद करण्यासाठी कर्तव्यावर निघालेल्या पोलीस पथकावर हल्ला करून शिवीगाळी व पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तरूणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पेालिस ठाण्याचे शासकिय वाहन घेवुन सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, बापू मोरे, चालक अय्युब खान असे नेहमीप्रमाणे १०.३० वाजता अस्थापना बंदला निघाले होते. पद्मालय विश्राम गृहाजवळ रस्ता अडवून उभे असलेल्या तरुणांना पोलिसांनी हटकले. बियरबारच्या बाहेर रस्त्याच्या मधोमध दुचाकी MH.19.DH.5577 आडवी लावून सोबत असलेले आठ- दहा तरुण उभे होते. त्यापैकी याहमा वरील राजेंद्र भगवान पाटिल(वय-३८, रा.मारोतीपेठ नेरीनाका, जळगाव) याने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिस कर्मचारी बापू मोरे व प्रफुल्ल धांडे यांच्या अंगावर धावून जात झोंबाझोबी करत धक्काबुक्की केल्याने पेालिसांनी त्याला ताब्यात घेत पेालिस ठाण्यात आले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीवन राजेंद्र पाटील याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार करीत आहे.

Protected Content