नेहते येथे केळी व्यापाऱ्याचे कार्यालय फोडून १० हजाराचा मुद्देमाल लांबविला

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेहता येथील केळी व्यापाऱ्याचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड सह कार्यालयातील वस्तूंची चोरी करून १० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा प्रकार २५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नेहता येथील केळी व्यापारी महेंद्र कडू पाटील (वय-३८) यांचे गावातील तोल काट्याचे व केळी गृपचे कार्यालय आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी कार्यालय बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंड्याचे कुलूप तोडून कार्यालयातील ६ हजार रूपये रोख, २ हजार रूपये किंमतीचे होम थिएटर आणि २ हजार रूपये किंमतीचे जेवनाचे भांडे आणि गॅस शेगडी व इतर वस्तू असा एकुण १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून सोनवणे करीत आहे.

Protected Content