पिंप्री येथील हार्डवेअरचे दुकान फोडण्याचा प्रयत्न; धरणगाव पोलीसात गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील हार्डवेअर दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील सामानांची तोडफोड केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील रहिवाशी चेतन विजय मालू (वय-३४) यांचे धरणगाव जळगाव रस्त्यावर हॉटेल शितल समोर सिरॅमिक्स हार्डवेअर नावाचे दुकान आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री २ वाजता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करून दुकानातील गल्ला तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाल्याने रिकामे हाती पारले आहे. दरम्यान या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएम ५१६६) ही बेवारसरित्या आढळून आली आहे. चेतन मालू यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. दिपक पाटील करीत आहे.

Protected Content