शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या सेवा केंद्र चालकावर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । पीक विम्याच्या पावत्या फाडून ती रक्कम परस्पर हडप करणार्‍या येथील वेदांत सीएससी केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील वेदांत सीएससी केंद्राचा संचालक गिरीश बिरारी याने सन २०१७ पासून हेडावे, गडखांब, हिंगोणे, दहिवद, तासखेडा, खोकरपाट, सडावन, वंजारी, नगाव, बिलखेडा, वावडे, मांडळ, मंगरूळ, धानोरा, एकलहरे आदी गावातील सुमारे ६१ शेतकर्‍यांकडून पीक विम्याच्या हप्त्यापोटी १ लाख ५८ हजार ४६५ रुपयांचे हप्ता वसूल केला. मात्र, ही रक्कम कंपनीकडे न भरता हडप केली. यामुळे संबंधीत शेतकर्‍यांचे ४६ लाख १० हजार ५३३ रुपयांचा पीक विम्याचे नुकसान झाले. याप्रकरणी रवींद्र भाऊराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात वेदांत सीएससी केंद्राचे मालक गिरीश बिरारी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content