लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने तरूण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कपड्यांचे पैसे घेतले ते परत मागण्याच्या कारणावरून तरूणाला चौघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहेमान शेख अब्दुल्ला (वय-२३) रा. रहिम नगर, शिरसोली रोड, जळगाव हा तरूण आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. अब्दुल रहेमान यांच्या पत्नीने गल्लीत राहणारे उमर शरिफ यांच्या आईकडून काही कपडे विकत घेतले होते. त्याचे पैसे दिले नाही म्हणून उमर शरीफ याने अब्दुल रहेमान याला सोमवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घरासमोर बोलावून पैशांचा वाद झाला. यानंतर उमर शरिफ, शोहेब लतीफ बागवान रा. गुलाब बाबा कॉलनी, आदिल उमर शरिफ बागवान, अरबाज उमार शरिफ सर्व रा. रहिम नगर, जळगाव या चौघांनी लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. यामध्ये अब्दुल रहेमान याच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Protected Content