श्री छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान व शाहिरी पोवाडे यांचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे श्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्ताने शुक्रवार दि. ६ मे रोजी व्याख्यान व शाहिरी पोवाडे यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामध्‍ये एकाच दिवसी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक प्रशासकीय विभागातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी दि. ६ मे  रोजी  सकाळी ११.००   वाजता राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी प्रा. गणपत धुमाळेयांचे विशेष व्याख्यान आयोजित केलेले आहे. या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर आपले विचार मांडतील, तर शाहीर शिवाजी पाटील व सहकलाकार यांचे राजर्षी  शाहू महाराज  यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक व शैक्षणिक, राजकीय विचारधारा, समता मूलक समाज निर्मितीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान, राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक पैलू अशा आशयाच्या विविध विषयांवर व राजर्षी शाहू महाराज यांच्या वैचारिक पैलूंवर विशेष व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम राज्यातील सर्व प्रशाकीय विभागात आयोजित करण्यात आलेला आहे.

जळगाव येथे  होऊ घातलेल्या राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनी विशेष  व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकाराचा किंबहुना राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या विचारवंताचे विशेष व्याख्यान तसेच शाहिरी पोवाडा, गीतगायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी  आस्वाद घ्यावा असे आवाहन विभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

Protected Content