अमळनेरात ‘या’ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मिळाली प्रशासकीय मान्यता

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आ. अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी तालुक्यातील ‘या’ दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास राज्याच्या जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली.

या प्रशासकीय मान्यतामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा काठच्या असंख्य गावांना याचा फायदा होणार आहे. एकाच वेळी दोन्ही गावांच्या फड बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार असल्याने हे अतिशय महत्वपूर्ण काम आमदारांनी मार्गी लावले आहे. यात मुडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 3,60,75,931 रुपये रकमेस मान्यता मिळाली असून मुडी फड बांधाऱ्यासाठी 1,09,78,257 एवढ्या रकमेस मान्यता मिळाली आहे. याबाबत जलसंपदा विभागाचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

दरम्यान पांझरा नदीचा उगम शेदवड ता साक्री या ठिकाणा वरून असून पांझरा नदी पश्चिम ते पूर्व अशी वाहत जावून मुडावद, ता.शिंदखेडा, जि धुळे येथे तापी नदीस मिळते. पांझरा नदीची लांबी 138 कि. मी. असून त्यावर ठिकठिकाणी 30 फड पध्दतीचे बंधारे असून सिंचनाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून 200 ते 500 वर्ष मागील कालखंडात बांधण्यात आलेले आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रात त्याखालील फड पध्दतीच्या बंधा-याच्या सिंचनासाठी समावेश आहे. मुडी आणि मांडळ हे फड बंधारे हा वरील 16 फड पध्दतीच्या बंधा-यामधील असून न्याहळोद गावाच्या खालच्या बाजूस धुळे शहरापासून २५ कि मी अंतरावर आहे. सद्यास्थितीत बंधा-याची स्थिती चांगली असून कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून कालव्यावरील बांधकाम व विमोचके यांची दुरूस्ती तसेच नव्याने बांधणी करणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठीच दोन्ही बंधारे दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.

असा आहे मुडी बंधारा

मुडी फड बंधा-याचे सिंचन क्षेत्र 167 हेक्टर असून मुख्य कालवा 9.40 कि. मी. लांबीचा असून त्यावरील वितरीका क्र. एक ही 1.25 कि. मी. लांबीची असून वाढविस्तार वितरीका 1.8 प कि. मी. लांबीची असून त्याव्दारे भाल्या नाल्याचे पांझरा नदी मधून पुर्नभरण करणे सह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करणे प्रयोजन आहे.

सदर बंधा-यामध्ये नदी एस्केप बांधकाम करणे, कालवा पक्ष भिंत बांधकाम करणे, नदी एस्केपबाधकाम करणे, रस्ता क्रॉसिंग बांधणे, मुख्य कालवा व वितरीका मोचक बांधकाम करणे, मुख्य कालवा व विमोचक बांधकाम करणे मुख्य कालव्याचे लोखंडी फळयांचे क्रॉस, रेग्युलर व मायनर यांचे विमोचक बांधकाम करणे, मुख्य कालवा रस्ता क्रॉसिंग बांधकाम करणे इ.कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुडी फड बंधारा दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत तीन कोटी साठ लक्ष पंचाहत्तर हजार नऊशे एकतीस एवढया खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

मांडळ बंधाऱ्याचे वैशिट्य

मांडळ बंधा-याची स्थिती चांगली असून कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून कालव्यावरील बांधकाम व विमोचके यांची दुरूस्ती तसेच नव्याने बांधणी करणे क्रमप्राप्त आहे. मांडळ फड बंधा-याचे सिंचन क्षेत्र 199 हेक्टर असून मुख्य कालवा 8.45 कि मी लांबीचा असून त्यावरील वितरीका ही 1.05 कि मी लांबीची असून वाढविस्तार वितरीका 0.88 कि मी लांबीची असून त्याव्दारे भाल्या नाल्याचे पांझरा नदी मधून पुर्नभरण करणे सह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करणे प्रयोजन आहे.

सदर बंधा-यामध्ये जुना एस्केप वरील नव्याने बांधणे, रस्ता क्रासिंग बांधणे, मोहर नाल्यावरील जलसेतूची दुरूस्ती करणे.मुख्य कालवा वितरीका एकवरील वितरण व्यवस्थेमधील बांधकामाची दुरूस्ती करणे. सीआर कम आऊटलेट बांधणे, मुख्य कालवा विमोचक व रस्ताक्रॉसिंग बांधणे, हेकंळवाडी रस्त्यावर वितरीका मुखाशी रस्ता क्रॉसिंग बांधणे, वितरीका दोनवर रस्ता क्रॉसिंग बांधणे, इ. कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मांडळ फड बंधारा दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता. एक कोटी नऊ लक्ष अठयाहत्तर हजार दोनशे सत्तावन्न रुपये एवढया खर्चास मिळाली आहे.

सदर दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी दिल्याने आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. तर पांझरा काठावरील शेतकरी बांधव व जनतेने आमदार अनिल पाटील यांचे सदर मंजुरीबद्दल विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Protected Content