पाचोरा तालुक्यात ९७ टक्के लसीकरण

पाचोरा प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले असून तालुक्यात ९७ टक्के लसीकरण करण्यात आले आहे.

शुभारंभा प्रसंगी युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, प्रविण ब्राम्हणे, पप्पु राजपुत उपस्थित होते. पाचोरा शहरात ग्रामीण रुग्णालय, शिवतीर्थ मैदान, बस स्थानक, हनुमान वाडी, गजानन हाॅस्पिटल, कामगार कल्याण केंद्र, डॉ. भरत प्रजापत हॉस्पिटल, गांधी चौक, मिठाबाई शाळा, महादेव मंदिर, कृष्णापुरी, वरखेडी नाका, झुलेलाल मंदिर, डॉ. भोसले हॉस्पिटल, शिवाजी नगर, कन्या शाळा, भिमनगर, जागृती शाळा, तलाठी कॉलनी, डॉ. व्ही. बी. हॉस्पिटल, श्रैयस हॉस्पिटल या सह २७ केंद्रावर बालकांना पोलियो लसीकरण करण्यात आले. 

तसेच तालुक्यातील लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ५९० बालकांना लसीकरण करून या केंद्राचे (९१.९० टक्के), लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ४४७ बालकांना (९५.७० टक्के), नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ७६० बालक (९७.४० टक्के), नांंद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र २ हजार ९९९ बालकांना लस टोचून (९२.९७ टक्के), वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ हजार ३६५ बालक (९७.११ टक्के), पाचोरा ७ हजार ७८५ बालकांना लसीकरण करून ९३.८९ टक्के लसीकरण झाले असुन येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार किशोर पाटील यांचे हस्ते लसी करण करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली २२८ बुथवर ६२९ कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम केले. यात आरोग्य सेवक,सेविका, आरोग्य सहाय्यक, अंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा स्वयमसेविकांनी सहभाग घेतला. पाचोरा तालुक्यात नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात (९७.४० टक्के) लसीकरण करून प्रथम तर लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ९१.९० टक्के लसीकरण करून शेवटचा क्रमांक लागला.

 

Protected Content