उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पौष्टिक आहार वाटप

यावल प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी वस्तीत पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. 

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सकाळी १० वाजता शहराला लागुन असलेल्या गोळीबार टेकळी या आदीवासी वस्ती पाडयावरील लहान मुलांना पौष्टिक आहार व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. 

याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर कार्यक्रमाच्या आदी यावल येथे उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष वसंत गजमल पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, यावल शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार, फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे व इतर प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!