उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । हाथरस उत्तरप्रदेश मधील पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मनिषाला न्याय मिळावा तसेच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशा मागण्यांसाठी संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मनीषा या निष्पाप मुलीवर बलात्कार करणारे नराधम जितके जबाबदार आहेत त्यापेक्षा ही अमानुष अत्याचार तेथील पोलीस प्रशासनाने आणि राज्याच्या शासनाने या मुलीवर केले आहेत. या घटनेला दडपून टाकण्यासाठी व आरोपींना संरक्षण देण्यासाठी जी कृत्य चालवली आहेत ती या देशाच्या आजवरच्या सर्व मानवी मूल्यांना काळिमा फासणारी आहेत. त्यामुळे या घटनेचा कितीही तीव्र निषेध केला तरी तो कमीच आहे. या घटनेचे आरोपी यांना फाशी द्या तेथील पोलीस प्रशासन व यात प्रशासनातले जे ही सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी व योगी सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी आजच्या धरणे आंदोलनात करण्यात आली.

योगी सरकार मुर्दाबाद -योगी सरकार बरखास्त करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, सर्वप्रथम महात्मा गांधीजी प्रतिमेला पुष्पांजली वाहून व त्याच वेळी मृत पावलेल्या सर्व पीडितांना श्रद्धांजली देऊन धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या धरणे आंदोलनाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांनी या आंदोलनाची पार्श्‍वभूमी विदीत केली. त्यानंतर निवेदन फारुख शेख यांनी वाचले यांनी केले.

आमदार शिरीष चौधरी यांनी या उत्तर प्रदेश सरकारचा व खास करून योगीजी यांच्या कार्यकाळात होत असलेल्या अत्याचारांचा पाडा सादर केला. माजी उपमहापौर करी मसाला यांनीसुद्धा हे सरकार कसे महिलांवर अत्याचार करणारे आहेत हे आकडे सादर केले.

संविधान बचाव चे भारत ससाने, इकरा कॉलेजच्या प्राध्यापिका फिरदोस काजी, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्राध्यापिका कलावती पाटील, भारतीय विद्यार्थी संघटनेचे मुकेश सावकारे, जमात-ए-इस्लामीचे मुश्ताक काझी, मुलतानी बिरादरीचे फिरोज मुलतानी ,युवा संघटनेच्या अलफईज पटेल, ईकरा कॉलेजची फरहान शेख, विद्यार्थी परिषदचे मुकेश सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलिम इनामदार, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष इरफान नुरी, छावा मराठा संघाचे अमोल कोल्हे, सुरेश चांगरे, जितू बागरे महेश चौधरी, भरत कर्डिले, युवा संघर्ष मोर्चा ,श्रीकांत मोरे ,संजय महाजन आदींनी मार्गदर्शन केले. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान उपस्थितांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना प्रतिभाताई शिंदे प्राध्यापिका कलावती पाटील, सचिन धांडे, फारुक शेख यांच्या माध्यमाने निवेदन देण्यात आले.

 

भाग-१
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1693315870843614/

भाग-२
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/752015685530150/

Protected Content