१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित होणार २० हजार कोटी रुपये

दिल्ली वृत्तसंस्था | २०२१ या वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विवंचनेत गेलं असलं तरी त्या सावटातून बाहेर पडत असतांना २०२२ हे वर्ष नवीन जनजीवन सुरळीत होऊन आर्थिक सुबत्ता राहील ही अपेक्षा शेतकऱ्यांसह देशातील नागरिक करत असतांना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थातच पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता दि. १ जानेवारी २०२२ रोजी देण्यात येणार असून देशातील एकूण १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

२०१८ सालापासून सुरु असलेल्या केंद्राच्या या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात.या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत १.६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, नव्या वर्षात दि.१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं ‘पीएम किसान योजने’चा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांना खालील प्रक्रिया पार पाडून
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहता येणार आहे.

सुरुवातीला ‘PM Kisan’ च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्यावी त्यांनतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली ‘Farmers Corner’ या ऑप्शनमध्ये ‘Beneficiaries List’ या ऑप्शनवर जावं. मग आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडावा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल त्यात आपले नाव पाहता येईल.

Protected Content