Home Cities अमळनेर कळमसरे येथे माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर

कळमसरे येथे माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर

0
103

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात 1997-98 एस.एस.सी वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेर गावी असलेले, आजी माजी विद्यार्थ्यांच्या भेटी झाल्या.

तब्बल 20 ते 22 वर्षांनंतर एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या कार्यक्रमात खास करून संपुर्ण गुरूजन स्टाप वर्ग आमंत्रित असल्याने सर्वच शिष्यांनी गुरुनप्रति कृतज्ञाता व्यक्त केली.

सदरील कार्यक्रम गावाबाहेर शेतात निसर्गरम्य वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य जी आर चौधरी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार जी टी टाक तसेच सेवानिवृत्त शिक्षक तसेच गुरुजन वर्ग होते.

दरम्यान स्नेहमेळावा निमित्ताने एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणी यांची एक आठवण म्हणून येथील शारदा माध्यमिक विद्यालय च्या प्रांगणात शिक्षकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

 

 


Protected Content

Play sound