Home क्रीडा दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; सरावादरम्यान खेळाडू गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; सरावादरम्यान खेळाडू गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल


बेंगळुरू-वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीग 2026 दरम्यान दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला असून सराव सत्रादरम्यान संघातील एक खेळाडू गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत संबंधित खेळाडूला तातडीने स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलविण्यात आल्याने संघ व्यवस्थापनासह चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू असतानाच नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोरदार सराव सुरू होता. याच सरावादरम्यान अचानक ही दुर्घटना घडली. सराव सत्र रंगात आलेले असतानाच एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली आणि काही क्षणांतच मैदानावरील वातावरण तणावपूर्ण बनले.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी खेळाडूला रक्तबंबाळ अवस्थेत स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. तातडीने वैद्यकीय मदत देत त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना संघासाठी मोठी चिंता ठरत आहे.

दिल्ली कॅपिटल्सची यंदाची IPL मोहीम आधीच चढ-उतारांनी भरलेली राहिली असून दुखापतींचे सावट संघावर कायम आहे. संघातील महत्त्वाचे खेळाडू उपलब्धतेच्या समस्यांना सामोरे जात असतानाच या नव्या धक्क्याने संघ व्यवस्थापनाचे डोकेदुखी वाढली आहे.

याआधी इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या जागी २२ वर्षीय रेहान अहमदची निवड करण्यात आली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क खांदा आणि कोपराच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकला आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

या पार्श्वभूमीवर सरावादरम्यान घडलेली ही दुर्घटना दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक मोठा धक्का मानली जात आहे. संघ आधीच आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना या जखमी खेळाडूची प्रकृती आणि उपलब्धता आगामी सामन्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

क्रिकेटविश्वात सरावादरम्यान झालेल्या या घटनेची चर्चा रंगली असून चाहत्यांकडून जखमी खेळाडूच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त होत आहेत. संघ व्यवस्थापनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


Protected Content

Play sound