नशिराबाद येथील विवाहितेचा १० लाखासाठी छळ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा कार घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील माहेर असलेल्या विवाहिता फरदोस जबीन अब्दुल अजित (वय-२१) रा. कंचनपूर,ता. उतरौला. जि. बलरामपूर (उत्तर प्रदेश) यांचा विवाहित अब्दुल अजित मोहम्मद मुबारक यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर तीन महिन्यांनी पती अब्दुल अजिज याने पत्नी हिला कार घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सासू, दीर आणि नणंद यांनी देखील पैश्यांसाठी गांजपाठ केला. दरम्यान, हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती  अब्दुल अजित मोहम्मद मुबारक, सासू कैसरजहा मोहम्मद मुबारक, दिर अब्दुल वाहिद मोहम्मद मुबारक आणि नणंद मैमुनाबी मोहम्मद सद्दाम सर्व रा. कंचनपूर ता. उतरौला जि. बलरामपूर (उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.

Protected Content