कोरोना : जिल्हा रूग्णालयात आज ५ संशयित दाखल

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आज कोरोनाचे ५ संशयित दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकुण २८ संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आले आहे. यातील १९ रिपोर्ट निगेटिव्ह तर २ जणांचे रिजेक्ट करण्यात आले.

आज ५ संशयित दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात ५ संशयित रूग्ण दाखल झाले असून त्यांचे रिपोर्ट पाठविण्यात आले आहे. ते याप्रमाणे
१. ३८ वर्षीय तरूण २१ मार्च रोजी दुबई येथून आलाय.
२. २४ वर्षीय तरूण १३ मार्च रोजी अमेरीकेतून आलाय.
३. ३२ वर्षीय तरूण ५ मार्च रोजी थायलंड येथून आलाय.
४. ५४ वर्षीय महिला ह्या १५ मार्च रोजी दुबई येथून आले. तर
५. २९ वर्षीय तरूण १८ मार्च रोजी मुंबई येथून आले आहे.

आजच्या परिस्थितीत ७ संशयित रूग्ण दाखल असून २८ संशयित रूग्णांपैकी २१ जणांचे रिपोर्ट आले आहे.

Protected Content