कोरोना : जिल्ह्यात आज ४८ बाधित रूग्ण आढळले

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून आज ४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात बाधित रूग्ण आढळून आले नाहीत. तर भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झालाय.

आजची आकडेवारी

चोपडा, पाचोरा, भडगाव, यावल, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही तर जळगाव शहर- २०, जळगाव ग्रामीण -३, भुसावळ-४, अमळनेर-७, धरणगाव-२, जामनेर-५, पारोळा-१, चाळीसगाव-५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ४८ रूग्ण बाधित आढळले आहे.

आजच्या कोरोना अहवालानुसार आजच्या जिल्हा कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार २५३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ५६६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३७० रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. यात आज भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे एकुण मृत्यू संख्या १ हजार ३१७ पर्यंत पोहचली आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे

Protected Content