ग्रामपंचायतींकडूनच मिळणार ऑनलाईन दाखले- बीडिओ शुभम गुप्ता

 

पारोळा, प्रतिनिधी । नागरिकांना लागणारे १८ प्रकारचे शासकीय दाखले घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.
नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पंचायत समितीने आपल्याकडील सर्व ऑफलाइन दप्तर ग्रामपंचायतींना परत दिले आहेत. ते त्यांना ऑनलाइन करण्याच्या तंबी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत स्तरावरच सर्व प्रकारचे ऑनलाईन दाखले मिळतील व वितरित होतील अशी माहिती प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी तथा गट विकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचायत समितीत दाखलेसाठी खेटा मारणाऱ्या नागरिकांचा यामुळे वेळ व पैसे या दोघांची बचत होणार असल्याचे श्री. गुप्ता यांनी स्पष्ट केले. पाच वर्षापासून ऑनलाइन दाखले हे ग्रामपंचायत स्तरावरूनच देण्याचे शासन निर्देशीत आहेत. परंतु पारोळा तालुक्यात त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नव्हती. श्री. गुप्ता यांनी ही बाब हेरून ते ग्रामपंचायतींना दाखले ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केल्याने नागरिकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा ऑनलाइन

बीडिओ गुप्ता यावेळी म्हणाले की, तालुक्यातील सर्व ११३ जिल्हा परिषद शाळा ह्या ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन केल्या जाणार आहेत. जवळपास ९८ शाळामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोविडच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी हा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे. १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या वतीने या शाळांना इंटरनेटसाठी लागणारे राऊटर उपलब्ध करून दिले जात आहे.
तसेच महिनाभरापासून पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना थम्ब मशीन बसविण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांना थम्ब आवश्यक करण्यात आले आहे. रोज त्याचा रिपोर्ट हा काढण्यात येतो. उशीर झाल्यास कर्मचाऱ्याची अर्धा दिवस किवा पूर्ण दिवस रजा ही टाकली जात आहे. यामुळे वेळेची शिस्त व दांड्या कमी होण्यास मदत झाली आहे.

येत्या महिनाभरात पशुसंवर्धन कार्यलय, लघु सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी कार्यलात देखील हे थम्ब मशीन कार्यन्वित करण्यात येणार असल्याची माहिती श्री. गुप्ता यी दिली. उद्या १८ डिसेंबर रोजी त्यांचा पारोळा बीडिओ पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. बागलन येथे तहसीलदार म्हणून ते यानंतर रुजू होणार आहेत.

ग्रामसेवकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

ऑनलाइन शाळा करिता लागणारे राऊटर हे १५ वा वित्त आयोग निधीतून दहशत निर्माण करून बिडीओ गुप्ता बळजबरीने खरेदी करवयला लावीत आहे अशी लेखी तक्रार पारोळा तालुका ग्रामसेवक संघटना ने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या बाबत त्यांना छेडले असता त्यांनी त्या तक्रारीला महत्व न देता यावेळी दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे सर्वच ग्रामपंचायत ते खरेदी करीत असून ग्रामसेवक देखील तयार आहेत असे सांगून निवेदनाची हवा काढून टाकली आहे.

Protected Content