प्रशिक्षण व शिक्षण परिषदेत सकारात्मक दृष्टिकोनातून भाग घ्या – केंद्र प्रमुख जितेंद्र पवार

WhatsApp Image 2019 12 24 at 4.23.32 PM

पारोळा, प्रतिनिधी | प्रशिक्षण व शिक्षण परिषदेत सकारात्मक दृष्टिकोनातून भाग घ्या असे आवाहन केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी केले. ते तालुक्यातील शेळावे केंद्राची ५ वी शिक्षण परिषद जि प केंद्र शाळा शेळावे बु॥ व जि. प. प्राथ शाळा धाबे ता. पारोळा यांच्या संयुक्त विदयमानाने शेळावे येथे घेण्यात आली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

शेळावे बु॥ व धाबे शाळेतील आदर्श विदयार्थी व आदर्श विदयार्थीनी तसेच सांकृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य धाबे शाळेच्या शिक्षकांकडुन बक्षिस देण्यात आले. शिक्षण परिषदेच्या उद्देशानुसार धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी शिक्षकांच्या मदतीने उत्कृष्ट असा परिपाठ सादर करून राष्ट्रगीत ते मौनपर्यंत सर्व घटकांचे महत्व स्पष्ट केले. शेळावे शाळेचे शिक्षक हेमराज पाटील यांनी ज्ञानरचनावादावर आधारीत इ १ ली गणित विषयाचा आदर्श पाठ शैक्षणिक साहित्याचा वापर करुन रंजक पध्दतीने सादर केला. जयश्री पाटील यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीचे छान व सोपे उपयुक्त उपक्रम स्पष्ट केले. भारती पाटील यांनी गणित आशय समृध्दी पेटीचा वापर कसा कौशल्यपुर्ण करावा हे प्रात्यक्षिक पुर्ण विवेचन सादर केले. शशिकला बोरसे यांनी इतिहास हा विषय विदयार्थ्यांना कसा रंजकपुर्ण, प्रेरणा, स्फूर्ती देणारा करता येईल याचे आवेशपुर्ण स्पष्टीकरण केले. धाबे शाळेचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी विदयार्थी स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना व उपक्रम सांगितले. केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी मासिक आढावा घेत शाळा सिद्धी ऑन लाईन भरणे, यु – डायस माहिती भरणे, अध्यक्ष चषक संघ तालुक्यावर नेणे, निष्ठा प्रशिक्षण, सगुण विकास कार्यक्रम माहिती भरणे, स्वर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वाटप याबाबत सखोल मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन मनवंतराव साळुंखे तर आभार गुणवंतराव पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Protected Content