जळगावातील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात भरला ‘भाजीबाजार’ (व्हिडीओ)

jalgaon dr. school

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे, तसेच गणितातील किलो, डझन, बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्या, या उद्देशाने आज ‘भाजीबाजार’ हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी स्वत: बाजार चालवून भाजीपाल्याची विक्री केली. पालक व इतर विद्यार्थ्यांनी खरेदी करीत या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच खरेदी करताना हिशेब आणि वस्तूची बारबाकाईने पाहणी करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी समजून घेतले. या बाजारात पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, भेंडी, काकडी, मुळा, पालक, मेथी, आवळा, पेरू, केळी तसेच कडधान्य, शेव, मुरमुरे, शेंगदाणे व शालेय साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. प्रत्यक्ष कृतीद्वारे केलेल्या या उपक्रमातून नवीन माहिती मुलांना मिळाली. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला.

Protected Content