देशमुख विद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.एन.एन.‌ गायकवाड व डॉ. एस. डी. भैसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

ऑगस्ट क्रांती दिना निमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे महत्व आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन.एन.  गायकवाड यांनी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. प्रा. एस. सी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content