चाळीसगावात बेवारस मृतदेह आढळला

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मस्जिद समोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील रेल्वेस्थानक समोरच्या मस्जिदीजवळ एका ५५ वर्षीय पुरूष जातीचा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरूवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ अभिमान पाटील हे करीत आहेत.

Protected Content