चाळीसगाव प्रतिनिधी । उसणवारीचे पैसे घराजवळ येऊन मागितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी कुर्हाडीने डोक्यात मारहाण करून जबर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील तळोंदे येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सोमा नरसिंह चव्हाण रा. तळोंदे ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सोमा यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी गावातील एकाला ३० हजार रुपये उसवारीने दिले होते. दरम्यान सोमा हा पैसे मागण्यासाठी गेला असता आरोपीने माझ्या घराजवळ येऊन पैसे मांगत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर भाऊ बाजिराव नरसिंह चव्हाण यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने लोखंडी कुर्हाडीने त्याच्या डोक्यात मारहाण करून जबर दुखापत केली. हि घटना शनिवार, २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून औषधोपचाराकामी बाजिराव नरसिंह चव्हाण यांना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाल्याने त्याच्या जाब जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.