जळगावात रूग्णवाहिकेचा मदतीने चोरी करणारे दोन भामट्यांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा रोडवर उभी असलेली कार चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरटे चोरी करण्यासाठी रूग्णवाहिकेचा वापर करत होते. ती रूग्णवाहिका देखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, कुणाल रामदास हातकर (वय-३६) रा. भुसावळ हे जळगाव येथील पिंप्राळा रोडवरील छाबडा एजन्सीवर व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीजे ०५५४) क्रमांकाची कार आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता कुणाल हातकर त्यांच्या कारने जळगावला आले. छाबडा एजन्सीसमोर कार पार्क करून ते मालकासोबत इंदौर येथे निघून गेले. २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेचार वाजता ते जळगावात दाखल झाले. दिवसभर काम केल्यानंतर ते कारने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले असता कारचा अज्ञात व्यक्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. त्यांनी मालक विनय लक्ष्मण चौधरी यांना सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी सीसीटीव्हीची तपासणी केली असता दोन अज्ञात व्यक्ती रूग्णावाहिकेतून उतरून कार चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी आज २९ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेजस मराठे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आज संशयित आरोपी योगेश संजय बाजड (वय-२२), रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड (वय-२३) रा.वाघनगर  गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण, नेत्रम शाखेचे कुंदन बयास यांनी तपासचक्रे फिरवीत दोघांना रुग्णवाहिका क्रमांक (एमएच.२४.सी.६८७१) सह ताब्यात घेतले आहे.  तपास संतोष खवले करीत आहे.

Protected Content