गाडीचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेला पैशांची मागणी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील बिस्मिल्ला नगरातील विवाहितेला गाडीचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहुन ५० हजार रुपयांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरुवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील बिस्मिल्ला परिसरात माहेर असलेल्या शाहीनबी हारून खान यांचा विवाह गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील हारून खान युसुफ खान यांच्याशी सन- २०१७ मध्ये रीती रीवाजानुसार झाला. लग्नाच्या १५ दिवसानंतर पती हारून खान याने विवाहितेला माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सोबत सासू-सासरे, दीर, जेठाणी आणि जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. अखेर या छळाला कंटाळून विवाहिता जामनेर येथे माहेरी निघून आल्या. गुरुवार १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात पती हारून खान युसूफ खान, जेठ समशेर खान युसुफ खान, ननंद समाबी हमीद खान, भाचा नजीम खान हमीद खान, त्याची पत्नी निशादबी नजीम खान, जेठ लतीफ खान युसुफ खान, जेठाणी शबानाबी लतीफ खान, ननंद आरेफाबी तस्लीम खान सर्व रा.अहमदाबाद गुजरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जयंत पगारे करीत आहे.

Protected Content