डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक आठवडा विविध उपक्रमांनी साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान रॅगिंग प्रतिबंधक आठवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

 

सदर संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची रॅगिंग होत नाही तसेच आगामी काळातही महाविद्यालयात रॅगिंग होऊच नये यासाठी हा जनजागृती सप्ताह उपयोगाचा निश्चितच ठरेल. रॅगिंग दंडनीय अपराध असल्याने हा अपराध होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनीही जागृक असणे गरजेचे आहे. हे महत्व या आठवड्यात विविध उपक्रमांद्वारे पटविण्यात आले. यामध्ये १२ ऑगस्ट रोजी अ‍ॅण्टी रॅगिंग डे साजरा करण्यात आला असून त्यावर डॉ.बापूराव बिटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोमवार दि.१४ रोजी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, मंगळवार दि.१५ रोजी अ‍ॅण्टी रॅगिंग अवेरनेस रॅली काढून जनजागृती काढण्यात आली. बुधवार दि.१६ रोजी रांगोळी स्पर्धा घेऊन त्याद्वारे रॅगिंग प्रतिबंधाबाबत डिझाईन्स रेखाटण्यात आल्यात. गुरुवार दि.१७ रोजी अ‍ॅण्टी रॅगिंग स्क्‍वॅडचे कार्य प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड व डॉ.बापूराव बिटे यांनी विद्यार्थ्यांसमोर विशद केले. शुक्रवार दि.१८ ऑगस्ट रोजी रॅगिंग प्रतिबंध आठवड्याची सांगता समारोपप्रसंगी पदव्युत्‍तर पदवी विद्यार्थ्यांनी निबंध वाचन, भित्‍तीपत्रकाचे सादरीकरण केले. तसेच पथनाट्याद्वारेही रॅगिंग प्रतिबंधाबद्दल जनजागृती केली. याप्रसंगी निवासी डॉ.आकाश जाधव, डॉ.कलीम, डॉ.जीवक काकडे तर पोस्टर प्रेझेंटेशन डॉ.विनय बुरडकर यांनी केले.

 

आज रॅगिंग प्रतिबंध आठवड्याच्या सांगता समारोहाप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.बापूराव बिटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांची प्रमुख उपस्थीती होती. याप्रसंगी सर्व निवासी डॉक्टर उपस्थीत होते. या उपक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर वृंद, माध्यम विभाग व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content