दुचाकीचा कट लागल्याने तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगरातील दुर्गा प्रोव्हीजन समोर गाडीच्या कट लागल्यावरून मारहाण व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात हमिदखान रियासत खान हा रविवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडीराव नगरातील दुर्गा प्रोव्हीजन दुकानासमोरून दुचाकीने जात असतांना दुचाकीचा कट गण्या उर्फ गणेश प्रकाश शिंदे (वय-२२) रा. खंडेराव नगर, जळगाव याला लागला. त्यावरून गणेशने त्याचे मित्र खंड्या उर्फ सनी प्रेमनाथ उनप (वय-२२), भुऱ्या उर्फ प्रविण सुभाष पाटील (वय-३०) आणि एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. खंडेराव नगर, जळगाव यांनी येवून हमीदखान रियासत खान याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हमीद खान रियासत खान याचे नातेवाईक शाहरूख शेख महमूद यांनी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलस ठाण्यात गणेश शिंदे, सनि उनम, प्रविण पाटील आणि एका अल्पवयीन मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.

Protected Content