तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची मागितली माफी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मराठा समाजाची जाहीर माफी मागितली आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आधीदेखील आपल्या वक्तव्यांसह वर्तनाने वादाच्या भोवर्‍यात सापडलेले होते. आता उस्मानाबाद येथील कार्यक्रमातल्या एका वक्तव्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यात बोलतांना त्यांची जीभ घसरली.

दरम्यान, या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफर टीका झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले की, मी मराठा समाजाचा आहे. तळागाळातील शेतकर्‍याचा मुलगा आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. राहिला विषय माफी मागायचा ज्या समाजाच्या जीवावर मी ताठ कॉलर करून हिंडतो. त्यांच्या हृदयाला खटकलं असेल तर मी एकदा नाही तर एक लाख वेळा माफी मागेन असे ते म्हणाले.. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा, जो जो मराठा कार्यकर्ता आहे. त्या अगदी पाळण्यातल्या बाळापासून ९० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वांची मी माफी मागतो असे सावंत म्हणाले. तसेच, २०२४ पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासनही तानाजी सावंत यांनी दिलंय.

Protected Content