मोदींना अहवाल देऊन ममता निघून गेल्या ; बैठक टाळली

 

कोलकाता : वृत्तसंस्था । चक्रीवादळ आणि हानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना हानीचा अहवाल दिला आणि निघून गेल्या त्यांनी बैठकीत थांबून चर्चा  करण्याचे टाळले

 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी बंगालच्या कलाइकुंडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मोदींनी घेतलेल्या आढावा बैठकीत सहभाग घेण्यासाठी टाळाटाळ केल्याने ममतांवर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी टीका केली आहे. अहवाल दिल्यानंतर ममता बैठकीतून निघून गेल्या.

 

यास चक्रीवादळा दरम्यान झालेल्या नुकसानभरपाई साठी मोदींनी मदत कार्यांसाठी १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यापैकी ५०० कोटी रुपये त्वरित ओडिशाला वितरित केले जातील. उर्वरित ५०० कोटी हे पश्चिम बंगाल आणि झारखंडसाठी झालेल्या नुकसानाचीच्या आधारे जाहीर केले जाईल.

 

“तुम्ही मला भेटायला फार दूर आलात. तुम्हाला मला भेटायचे होते, म्हणून मी आलो. माझे मुख्य सचिव आणि मी, आम्ही तुम्हाला हा अहवाल सादर करीत आहोत. आता मला माझ्या वेळापत्रकानुसार दिघा येथे जावे लागेल. मी रजा घेत आहे,” असे बॅनर्जी यांनी दीघा येथे सांगितले.

 

ममतांनी बैठकीत सहभागी होण्यास टाळाटाळ केल्याबद्दल धनखड यांनी टीका केली. आणि म्हटले की ते “घटनात्मकता किंवा कायद्याच्या राज्याशी सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या आढावा बैठकीला हजेरी लावली असती तर राज्य आणि लोकांचे हित झाले असते असेही धनखड म्हणाले.

 

Protected Content