कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १६९ संक्रमित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १६९ बाधित रूग्ण आढळले आहे. तर २७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दिवसभरात आज ४ बाधितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-६, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-०, यावल-२०, एरंडोल-१, जामनेर-२३, रावेर-१२, पारोळा-१२, चाळीसगाव-४२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ५०० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ४२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

Protected Content