मुक्ताईनगरात मोबाईलसह दागिने लंपास; सीसीटिव्हीत भामटा कैद

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सिड फार्म येथे राहणारे शेख हकीम शेख रशीद चौधरी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दोन सॅमसंग मोबाईल व टेबलावर ठेवलेली 30 ग्रॅम सोन्याची पोत असा एकूण 60 हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि 17 मार्च रोजी सकाळी 06:45 वाजेच्या सुमारास शेख हकिम शेख रशीद हे नगरपंचायतीची कचरा गाडीमध्ये कचरा टाळण्याकरता उठले व त्यावेळेस मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. कचरा टाकल्यानंतर घरासमोरील रोपांना पाणी टाकल्यानंतर ते घरामागील रोपांना पाणी टाकण्यासाठी मागे गेले होते. रोपांना पाणी टाकुन ते ठिक 7 वाजुन 10 मिनिटांनी घरात गेले. त्यावेळी त्यांनी पत्नी नाजेमाबी हिला विचारला की माझा मोबाईल चार्जिंग लावलेला होता ते दिसत नाही व त्यांनी पत्नी कडे तिचा मोबाईल मागितला. त्यावेळी पत्नी ने सागितले की, माझा मोबाईल पण सापडत नाही व त्याचे लक्षात आला की टेबलावर ठेवलेली 30 ग्रॅम वजनाची पोत सुध्दा घरात दिसत नसल्याने आमची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करुन मोबाईल व सोन्याची पोत चोरुन घेऊन गेला. त्यात  घराबाहेर लावलेले सिसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या एक अज्ञात व्यक्ती पांढरा रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट घातलेला व्यक्ती घरात आला चोरुन नेल्याचे समोर आले.

याबाबत शेख हकिम शेख रशीद चौधरी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरटय़ांविरुधात तक्रार दिली त्याचा तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोहेकॉ आसीम तडवी करीत आहे.

 

Protected Content