ट्रक मधून पडलेल्या कांद्याच्या गोण्या उचलण्याच्या कारणावरून विखरण येथे लाकडी दांडाने मारहाण

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विखरण येथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी कांद्याच्या ट्रक मधून पडलेल्या कांद्याच्या गोण्या उचलण्याच्या कारणावरून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तुका महाजन, समाधान माळी, भूषण महाजन, कैलास महाजन, योगेश महाजन, लोटन चौधरी व अनोळखी तीन-चार इसस्मानी चोरटक्की येथे नाना बाबुराव बागडे यांच्या घरी जाऊन जीवे ठार मारण्याच्या हेतूने लाकडी दांडा बागडे याच्या डोक्यात घातला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला तसेच किसन बाबुराव पवार त्याची पत्नी संगीता किसन पवार वैशाली ठाकरे व हिम्मत जुलाल पवार यांनाही मारहाण करण्यात आली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास एक जानेवारी 2024 रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

विखरण रस्त्यावर चोरटक्की गावाच्या ताडे लवण येथे एका ट्रक मधून कांद्याची सहा ते सात गोणी पडली असता त्या ठिकाणी नाना बागडे याचा मुलगा गणेश तसेच भिल्ल वस्तीतील इतर मुले ही कांद्याच्या गोणी उचलण्यासाठी गेले त्यानंतर सदर ट्रक पुढे काही अंतरावर थांबल्यावर सदर ट्रक मधून विखरण गावातील सागर उर्फ पवन चौधरी हा पाठीमागे आला व शिवीगाळ करून सदर गोण्या उचलण्यास विरोध केला त्यावेळी भिल्ल वस्तीतील मुले व त्या ट्रक मधील मुलांची बाचाबाची झाली त्यानंतर थोड्या वेळात विखरण कांदा व्यापारी सलीम खाटीक हे घटनास्थळी आले व कांद्याच्या गोण्या परत करा असे म्हणाला म्हणून एक गोणी परत करण्यात आली व बाकी गोण्या उद्या परत करू असे सांगण्यात आले

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर उर्फ पवन चौधरी व त्याचे साथीदार तसेच अनोळखी तीन-चार इसम यांनी चोरटक्की येऊन सागरला संध्याकाळी का मारले असा जाब विचारला त्यावेळी बागडे याला लाथा भुक्क्यांनी महान करण्यात आली तसेच बागडे याला हातातील दांडा डोक्यात मारणार तोच त्याने डावा हात आडवा केल्याने दांडक्याचा जोराचा प्रहार त्याच्या डाव्या हाताला व खांद्याला लागला या मारहाणीत बागडे गंभीर जखमी झाला त्यानंतर भिल्ल वस्तीत राहणारे किसन बाबूलाल पवार यांच्या घरी जाऊन किसन पवार यांची पत्नी संगीता पवार वैशाली आबा ठाकरे यांनाही मारहाण करण्यात आली तसेच त्यांना रस्त्यात भेटलेल्या हिम्मत जुलाल पवार याला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तालुक्यातील विखरण येथे एक जानेवारी 2024 सोमवार रोजी अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी कांदा भरण्यासाठी गेलेल्या मुजरांपैकी सागर चौधरी या आरोपीला ताब्यात घेतले असता या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी चोरट्टकीच्या युवकांनी केली असता ती फेटाळण्यात आल्याने पोलीस गाडीवर लाठ्या काठ्यानी हल्ला करण्यात आला. त्यामुळे पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व काही सहकाऱ्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली तसेच पोलीस पाटील विनायक पाटील हा सुद्धा जखमी झाला दोन्ही गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 30 ते 40 पोलीस तैनात करण्यात आले आहे दरम्यान दोन्ही गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

एरंडोल तालुक्यातील विखरण येथे सध्या कांदा खाडणीचे काम जोरात सुरू आहे 31 डिसेंबर रोजी काही मजूर दहिगाव येथील कांदा व्यापारी किशोर पाटील यांनी शेतकऱ्याकडून घेतलेले कांदे भरण्यासाठी विखरण येथून काही मजूर गेले होते संध्याकाळी कांद्याच्या गोण्या भरून माल ट्रकमध्ये येत असताना चोरटकी विखरण रस्त्यावर चार ते पाच गोण्याखाली पडल्या त्याखाली पडलेल्या कांद्याच्या गोण्या कोणाला सापडल्या याचा तपास करण्यासाठी विखरण येथील मजूर चौकशीसाठी चोरटकी इथे गेले त्या ठिकाणी त्यांनी विचारपूस केली असता चोरटकी येथील काही युवक व मजूर यांच्यात शाब्दिक चकमक झाली त्याचे पर्यावसान वादात झाले.

सोमवारी सकाळी चोरटक्की येथील युवकांनी आपल्या साथीदारांना एकत्र करून विखरण येथे हातात लाठ्या काठ्या व लोखंडी सळई लोखंडी पाईप घेऊन विखरण येथे दाखल झाले विखरण येथील पोलीस पाटील विनायक पाटील यांनी सदर प्रसंग पाहून एरंडोल पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली पोलिसांची गाडी बोलविण्यात आली पोलिसांनी कांदा भरण्यासाठी गेलेल्या मुजरांपैकी सागर चौधरी याला ताब्यात घेऊन पोलीस वाहनात बसवले त्यावेळी चोरटकी येथील युवकांनी पोलीस गाडीवर हल्ला केला त्यात पोलीस गाडीच्या काचा फुटल्या व पोलीस पाटील विनायक पाटील यांनाही जबर मारहाण करण्यात आली सध्या ते दवाखान्यात उपचार घेत आहे तसेच एरंडोल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी पोलीस हे हल्ल्यात जखमी झाले पोलिसांनी ज्यादा कुमक मागवली असून विखरण व चोरटक्की या दोन्ही गावांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

Protected Content