विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील विट भट्टीवर कामावर असतांना विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या  तरूणाचा मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविंद्र संतोष चौधरी वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र चौधरी हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी आणि मुलासह मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला  उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे २९ डिसेंबर रोजी सकाळी रविंद्र चौधरी हा कामावर असतांना त्याला विटभट्टीजवळ असलेल्या तारांवर ईलेक्ट्रीक वायर टाकत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. मयत झालेल्या रविंद्र चौधरीच्या पश्चात आई मिराबाई, वडील संतोष चौधरी, पत्नी रूपाली आणि मुलगा ऋषीकेश असा परिवार आहे.

 

Protected Content