उंटावदकर श्रीराम महाराजांच्या कीर्तनाचे झी टाँकीजवर होणार प्रसारण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथील रहिवाशी श्रीराम महाराज यांचे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात घेतलेल्या सहभागाचे झी टॉकीजवर प्रसारण करण्यात येणार आहे.स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत गत वीस वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील कीर्तनकारांनी आपली सेवा दिली आहे.३१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू आहे.

या किर्तन महोत्सवात उंटावद येथील रहिवाशी कीर्तनकार व कथाकार ह.भ.प. श्रीराम बापूराव पाटील यांनी केलेल्या किर्तन सेवेचे प्रसारण दि. २९, ३० व ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत झी टाँकीज या मराठी वाहिणीवर “मन मंदिरा”या मालिकेत प्रसारित होणार आहे यापुर्वीही श्रीराम महाराज यांचे  झी टाँकीज या वृत्तवाहिणीवर सकाळच्या “गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा” या कार्येक्रमात ७ वेळा कथा व किर्तनाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रवचन प्रसारीत झालेले आहेत तरी भावीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Protected Content