बारागाड्यांचे चाक गेले अंगावरून; दोन तरूण जखम ( व्हिडीओ )

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या फरकांडे येथे परंपरेनुसार ओढण्यात येणार्‍या बारागाड्यांचे चाक अंगावरून गेल्याने दोन तरूण जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, फरकांडे येथे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी बारागाडे ओढण्याची प्रथा आहे. या अनुषंगाने यंदाच्या आखजीलाही गावातील सोसायटी पासुन ते मारोती मंदिर गल्ली पर्यंत बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वर्षी बारागाडे ओढण्याचा बहुमान योगेश नाना पाटील यांना मिळाला. प्रचंड उत्साहात बारागाड्या ओढण्यास प्रारंभ झाला. बारागाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असली तरी सुरळीतपणे याला ओढले जात होते. अचानक गाड्यांवरील काही तरूण हे खाली फेकले गेले. यापैकी शरद पंडित पाटील व पप्पु श्रीराम पाटील हे गाड्याच्या चाका खाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील शरद पाटील यांच्या पोटावरुन चाक गेल्याने त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पप्पु पाटील यास एरंडोल येथुन उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर जखमी तरूणांना लागलीच बाजूला करून बारागाड्यांनी सुरळीतपणे पुढील अंतर कापले. दरम्यान, हे तरूण नेमके कशामुळे खाली पडले याची माहिती कळली नाही.

पहा : बारागाड्यांखाली तरूण आल्याचा श्‍वास रोखून धरणारा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content