रामायण नगरातून एकाची दुचाकी लांबविली

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । वरणगाव रोडवरील रामायण नगर भागातून घराचे लोखंडी गेट तोडून दुचाकी चोरी केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीला आली आहे. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील वैजनाथ वर्मा (वय-४४) रा.रामायण नगर, वरणगाव रोड, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच  १९ एएच ५६७) क्रमांकाची दुचाकी आहे. बुधवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या पार्किंगच्या आवारात लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे लोखंडे गटाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुचाकी लांबविली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आला आहे. दरम्यान त्यांनी परिसरात सर्वत्र माहिती घेतली असता याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.  अखेर रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे कॉन्स्टेबल रमण सुरळकर करीत आहे.

Protected Content