जुना सातारा खळवाडी परिसरातून दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील जुना सातारा खळवाडी रोड परिसरातून एकाची दुचाकी चोरून येण्याचे गुरुवारी पहाटे समोर आले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश प्रभाकर भोळे (वय-५२, रा. जुना सातारा खळवाडी परिसर, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची (एमएच १९ इडी ७४१४) क्रमांकाची दुचाकी आहे. गुरूवारी १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री त्यांची दुचाकी घरासमोरून पार्किंगला लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकीबाबत काहीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी १ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कविता विसपुते करीत आहे.

Protected Content